भिषण कार अपघात ; दोन महिलांचा मृत्यू तर तीन जखमी

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : चामोर्शी -गडचिरोली महामार्गावर झालेल्या भिषण कार अपघातात दोन महीला जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री कुरुड गावाजवळ घडली. या अपघातात जनाबाई दोणाडकर (65) रा. बिडरी ता. एटापल्ली व शालू देविदास दहागावकर रा.पेरमिली यांचा मृत्यू झाला. तसेच पिंकी दोणाडकर गंभीर जखमी तर हेमंत दोणाडकर व निषा दोणाडकर किरकोळ जखमी आहेत .
सापाने चावा घेतल्याने पिंकी दोणाडकर यांना 17 तारखेला अहेरी येथील उप जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने तेथील डॉक्टरांनी गडचिरोलीत हलविण्याची सूचणा केली होती. त्यानंतर काल सायंकाळी हेमंत दोणाडकर आपल्या कारने गडचिरोलीकडे येत असतांना कुरुड गावाजवळ त्यांचे वाहणावरील ताबा सुटल्याने भिषण अपघात घडला. यात जनाबाई दोणाडकर जागीच ठार झाल्या तर शालू दहागावकर यांचा गडचिरोलीतील रुग्णालयात उपचारासाठी नेत आसताना मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहे.