लोहखनिज वाहणारे ट्रक रस्त्यालगत जंगलात घुसले

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : सुरजागड लोहखनिज प्रकल्पातून लोह वाहून नेणा-या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्यालगतच्या जंगलात घुसल्याची घटना 19 एप्रिल रोजी आष्टी मार्गावरील सोमनपल्ली फाट्यालगत घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसले तरी सदर अपघात एवढा भीषण होता की यात रस्त्यालगत असलेले मौल्यवान असे तीन सागवान झाड अक्षरश: कोसळल्या गेले.
प्राप्त माहितीनुसार सुरजागड लोहखनिज प्रकल्पात वाहतूकीसाठी असलेले एम. एच. 34 बीजी 7751 क्रमांकाचे ट्रक लोह वाहून नेत असतांना आष्टीलगतच्या कोसनरीपासून अवघ्या 2 किमी अंतरावर असलेल्या सोमनपल्ली फाट्याजवळ ट्रक चालकाचे ओव्हरटेक करण्याच्या नादात वाहनावरील नियंत्रण सुटून थेट रस्त्यालगतच्या जंगलात घूसल्या गेले. सदर अपघात एवढा भीषण होता की या अपघातात रस्त्यालगत असलेले मौल्यवान असे तीन सागवान झाड कोसळल्या गेले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सदर अपघात वाहन चालकाला डुलकी आल्याने झाल्याचे बोलल्या जात आहे.
सदर मार्गावर 24 तास शेकडो अवजड वाहनांद्वारे लोह खनिजाची वाहतूक केली जात आहे. सदर मार्गावर नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ राहत असून या वाहन चालकांमध्ये नेहमीच चढाओढ सुरु असते. या चढाओढीत सदर अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे.