वूडबॉल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचा मुलींचा संघ ठरला अव्वल

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वूडबॉल मुलींच्या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ संघाने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम स्थान पटकाविले आहे. मुलींच्या या यशाने गोंडवाना विद्यापीठाने आंतर विद्यापीठ स्तरावर आपल्या यशाचा झेंडा रोवला.
वुडबॉल स्पर्धेत विद्यापीठाच्या प्राजक्ता धोंगडे, डिंपल प्रधान, प्रियांका यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरीची विद्यार्थीनी प्रियांशू यादव, एन. एच. महाविद्यालय ब्रम्हपूरीची पूनम प्रधान, एन. एस. महाविद्यालय भ्रदावतीची एकता खांडोकर, सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाहीची मृणाली बोरकर, आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूरची साक्षी तेलंग या मुलींनी सहभाग नोंदविला होता. या मुलींनी सांघिक कामगिरी करीत उत्तम प्रदर्शन करीत अव्वल स्थान पटकाविले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक शाहरुख रहीम शेख, अक्षय कुशल धोंगडे, दिव्या धोटे, विद्यापीठाच्या क्रीडा संचालक डॉ. अनिता लोखंडे यांना दिले आहे. मुलींच्या यशासाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र देव, मानव विज्ञान अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली यांनी अभिनंदन केले आहे.