विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करा ; अन्यथा आंदोलन – अभाविप

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदनातून दिला आहे.
विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे मूल्यमापन नमुना आदर्श उत्तरपत्रिका तयार करून करावे, चालू नवीन शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या सर्व स्तरावरील क्रीडा स्पर्धेत विद्यार्थीनीकरिता महिला व्यवस्थापक व प्रशिक्षक पाठविण्यात यावे, विद्यापीठातील वसतिगृह व सभागृहाला महापुरुषाची नावे द्यावी, मॉडेल कॉलेजच्या नविन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची माहिती द्यावी, विद्यार्थी विकास योजनांची माहिती विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक करावे, विद्यार्थी सुविधा केंद्राची निर्मिती करावी, विद्यापीठाने परीक्षा शुल्क किमान पाच वर्ष कायम ठेवावे, रिचेकिंग मध्ये जे विद्यार्थी पास झालेत अशा सर्व विद्यार्थ्यांना त्याचे परीक्षा शुल्क परत द्यावे, विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी, विद्यापीठाचे परिपत्रक व नोटिफिकेशन विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावे, विद्यापीठातील वसतिगृहात अग्निवीर मार्गदर्शन केंद्र सुरु करावे, विद्यापीठ परिसरात भगवान बिरसा मुंडा व स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, सीएचएलआर सेंटरची फी कमी करावी, लवकरात लवकर संशोधक विद्यार्थ्यांना अधीछात्रवृत्ती बहाल करावी, विद्यार्थ्यांना अपघात विमा म्हणून एक लाखापर्यंतची रक्कम द्यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या मार्गी न लावल्यास अभाविपतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देतेवेळी अभाविपचे प्रांतमंत्री शक्ती केराम, विभाग संयोजक वैदेही मुडपल्लीवार, जिल्हा संयोजक चेतन कोलते, चंद्रपूर जिल्हा संयोजक शैलेश दिंदेवार, जिल्हा सहसंयोजक जयेश भडघरे, ब्रम्हपुरी जिल्हा संयोजक श्रुती कन्हेकर, सहसंयोजक संदेश उरकुडे, नगरमंत्री अभिलाष कुनघाडकर, तूषार चुधरी, दिक्षा पिपरे, अमोल मदने, पीयुष बनकर, चंद्रपूर नगर संघटन मंत्री ऋतिक कनुजिया, गडचिरोली संघटन मंत्री राहूल श्यामकुवर, चंद्रपूर संघटन मंत्री अमित पटले व मोठ्या संख्येने अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.