भरधाव कारची झाडाला धडक ; चिमुकल्याचा मृत्यू तर तीन जखमी

GADCHIROLI TODAY
आरमोरी : नातेवाईकांच्या लग्न समारंभाहून परतताना भरधाव कार झाडावर आदळून तीन वर्षाचा चिमुकला ठार तर तीन जखमी झाल्याची घटना देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कासवी फाट्याजवळ 23 एप्रिलला दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, प्रमोद शरद डुंबरे (40), दीक्षा प्रमोद डुंबरे (37) रा. वैरागड हे मुलगा शिवांश (6) व दुर्गांश (3) यांच्यासह कारमधून नातेवाईकांच्या लग्नासाठी अर्जुनी तालुक्यातील बुद्धेवाडा येथे गेले होते. लग्न झाल्यावर ते गावी परतत होते. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांची कार देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कासवी फाट्याजवळ आली. यावेळी प्रमोद यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर जावून आदळली. यात चौघेही जखमी झाले. त्यांना आरमोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून दुर्गांशला मृत घोषित केले. इतर तिघांवर उपचार सुरु आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.