गडचिरोली शहरातील घटना ; युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : एका युवकाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना GADCHIROLI शहरातील विवेकानंद नगरात मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. गणपत अनिल वरगंटीवार (21) रा. विवेकानंदनगर असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, विवेकानंदनगर येथील युवक गणपत हा काल रात्री घरात एकटाच होता. दरम्यान, रात्रोच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळच्या सुमारास शेजा-यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचा मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.