रोजगार व स्वयंरोजगार मेळावा ; नामांकित कंपन्या होणार सहभागी

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : स्थानिक कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, आणि कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 2 मे ला 10 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती, विकास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास हे महामंडळे उपस्थित असणार आहेत. रोजगार व स्वयंरोजगाराचा लाभ घेण्यासाठी‍ ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने केले आहे.