पेरमिली दलम कमांडरसह तीन नक्षल्यांचा खात्मा ; गडचिरोली पोलिसांचे मोठे यश

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलातील C-60 जवान व नक्षल्यांमध्ये उडालेल्या चकमकीत पेरमिली दलम कमांडरसह तीन नक्षल्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. ही घटना भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस मदत केन्द्र अंतर्गत येत असलेल्या केडमारा जंगल परिसरातील सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.
C- 60 पोलीस जवान नक्षल विरोधी अभियान राबविताना जंगलात आधीच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवानावर अंधाधुंद गोळीबार केला. त्यात पोलिसांनी ही प्रतिउत्तर देत नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला असता त्यात तीन नक्षल्याचा खात्मा करण्यात पोलीस जवानांना मोठे यश आले आहे. चकमकीत खात्मा झालेल्या नक्षल्यात एक पेरमिली दलम कमांडर बिटलु, सदस्य वासु तसेच अहेरी दलम सदस्य श्रीकांतचा समावेश असून घटनास्थळी नक्षल साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले. घटनास्थळी शोधमोहीम सुरू असून पाऊस येत असल्याने तसेच घनदाट जंगल असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे.