गडचिरोली शहरात भीषण अपघात ; ट्रेलर ट्रकने युवकास चिरडले

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : ट्रेलर ट्रकने इसमास चिरडल्याची घटना road accident गडचिरोली शहरातील कारगिल चौकात आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढे भीषण होते की मृतदेह पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येत होता.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर शहराकडून भरधाव येणाऱ्या ट्रेलर ट्रकच्या चाकाखाली सायकलस्वारास आल्याने चंद्रपूर मार्गावरील कारगिल चौकात भीषण अपघात घडला. या अपघातात चाकात अडकलेल्या इसमाला ट्रकने जवळपास 100 ते 200 मीटरपर्यंत फरफटत नेले. या अपघातात इसमाचा जागीच मृत्यू झाला असून मृतदेहाचे जागोजागी तुकडे पडले होते. मृतदेह छिन्न – विच्छिन्न अवस्थेतच चाकात अडकला असल्याने बघ्यांच्या अंगावर काटा येत होता. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला आहे. वृत्त लिहेस्तोवर मृतकाचे नाव कळू शकले नाही.