९ मे पासून गोंडवाना विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा , ९२०८९ विद्यार्थी होणार प्रविष्ट

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ परीक्षेला ९ मे पासून प्रारंभ होणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विद्यापीठ परिक्षेत्रातील चंद्रपूर जिह्यात ४३आणि गडचिरोली जिल्ह्यात २४ असे एकूण ६७ परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आली आहेत. पदव्युत्तर पदवीकरिता १६ हजार ७५३ तर पदवी परीक्षेकरिता ७५ हजार ३३६ असे एकूण ९२हजार ०८९ विद्यार्थी उन्हाळी परीक्षांकरिता प्रविष्ट होणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, भामरागड, एटापल्ली, आल्लापल्ली, मूलचेरा, सिरोंचा ,मालेवाडा ही आठ परीक्षा केंद्र अतिसंवेदनशील आहेत. असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी कळविले आहे.