उद्यापासून आरमोरीत बुध्दजयंती महोत्सव ; बुध्द भीम गीतांसह विविध उपक्रम

GADCHIROLI TODAY

आरमोरी : तथागत भगवान गौतम बुध्दाच्या परिशुध्द जीवनाचा व मंगलमय व अति वैशिष्ट्यपुर्ण घटनाक्रमाचा दिन म्हणजे बुध्द पोर्णिमा ! या महत्वपूर्ण दिनाचे औचित्य साधून जेतवन बौध्द समाज विकास मंडळाच्या वतीने आरमोरी येथे 5 मे ते 7 मेपर्यंत तीन दिवसीय बुध्द जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्रो 7.30 वाजता बुध्द पौर्णिमा जयंती महोत्सवाचे उद्घाटन प्रेरणा शिक्षण संस्था, वडधाचे अध्यक्ष मदन मेश्राम यांच्याहस्ते होणार आहे.
अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राजकुमार शेंडे राहतील. तर सहउद्घाटक म्हणुन शिक्षणमहर्षी भाग्यवान खोब्रागडे, सत्कारमूर्ती भिवापुरचे तहसिलदार कल्याणकुमार डहाट, पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणुन सामाजिक कार्यकर्त्या शालिनी गेडाम, सामाजिक विचारवंत जयकुमार मेश्राम, पोलिस निरिक्षक संदिप मंडलीक, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र बन्सोड, वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, नगराध्यक्ष पवन नारनवरे, माजी पंस सभापती अशोक वाकडे, तथागत बुद्ध विहारचे अध्यक्ष यशवंत जांभूळकर, नप सभापती भारत बावनथडे, विलास पारधी, नगरसेवक प्रशांत सोमकुंवर, माजी प्राचार्य पी. के. सहारे, डॉ. प्रदिप खोब्रागडे, डॉ. रायपुरे, प्राचार्य साईनाथ अदलवार, प्राचार्य सुरेश चौधरी, माजी जिप सभापती वेनु ढवगाये, डॉ. शिलु चिमुरकर, प्रा. स्नेहा मोहले आदी उपस्थीत राहणार आहेत.
6 मे रोजी रात्री 7.30 वाजता लॉर्डबुध्द टिव्ही फेम चंद्रपूर येथील प्रविण वाळके यांचा ‘अमृतवाणी ही बुध्दाची’ हा समाजप्रबोधनपर बुध्द भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. 7 मे रोजी सायंकाळी जेतवन बुध्द विहारात भंते विमल किर्ती, भिक्कुनी सुमेधा (सावंगी) यांच्या उपस्थितीत सामुहिक बुध्द वंदना, भोजनदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जेतवन बौद्ध समाज विकास मंडळ व नवयुवक मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.