पाय, हातांमध्ये अशक्तपणा, पाठदुखीसह विविध आजारांवर होणार सर्चमध्ये उपचार ; ६ ला ‘वेदना व्यवस्थापन ओपीडी’

GADCHIROLI TODAY

गडचिरोली: धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने नियमित वेदना व्यवस्थापन ओपीडी सुरु झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी ही ओपीडी असेल. ६ मे रोजी वेदना व्यवस्थापन ओपीडी घेण्यात येणार असून डॉ. जितेंद्र जैन व सहकारी डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी करणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या पाहता व मागील महिन्यात झालेल्या ओपिडीला रुग्णांचा प्रतिसाद बघता सर्च येथील माँ दंन्तेश्वरी रुग्णालयात ६ मे रोजी वेदना व्यवस्थापन ओपिडी आयोजित केली असून ही ओपीडी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी होईल. ओपीडीचे मार्गदर्शन मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन हे करतील. या ओपीडीमध्ये पाठीचा कणा दुखणे, पाठदुखी, मज्जातंतू वेदना, लंबर स्पॉन्डिलायसिस: सकाळी कडकपणा, पाठीत वेदना, जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, वाकताना किंवा उचलताना वेदना होणे, मानेचा स्पॉन्डिलायसिस: डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होणे, पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा येणे, मानेत कडकपणा जाणवणे, तोल गेल्यासारखे वाटणे, खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे. पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे, आतडी आणि मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे, मागे वाकताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे, पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे, टाचेचे दुखणे, डोकेदुखी यामुळे होणार्‍या वेदना व तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या वेदना या सर्वांवर उपचार होईल. तरी या वेदना व्यवस्थापन ओपिडीचा लाभ रुग्णांनी घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे.