नाल्यावरील अतिक्रमण प्रकरण पुन्हा तापणार ; विद्यानगरातील नागरिक आक्रमक

निवेदनातून आंदोलनाचा इशारा

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : कुरखेडा येथील मुख्यमार्गावर असलेल्या नाल्यावर अतिक्रमण करून केलेले पक्के बांधकाम पाडून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्याकरिता मागील ८ महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र, आता विद्यानगरातील रहिवाशांच्या सहनशीलतेचा बांध तुटला असून, येत्या ८ दिवसात अतिक्रमणाबाबत सकारात्मक पुढाकार घेत अतिक्रमण काढले नाही तर आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन कुरखेडाचे तहसीलदार यांच्यामार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
कुरखेडातील मुख्य मार्गावर असलेल्या प्रमुख नाल्यावरील प्रवाह खंडित करून नाला बुजवून पक्के बांधकाम केल्याने अतिवृष्टीमुळे विद्यानगर परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचून पुर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आक्रमक झालेल्या विद्यानगर येथील रहिवाशांनी कुरखेडा -वडसा मार्गावरील वाहतूक 2 तास अडवून अतिक्रमणाबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली होती. मागील 8 महिन्यापासून सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्यामुळे सदर नाल्याची व जमिनीबाबत रीतसर मोजणी होवून भूमी अभिलेख कार्यालयकडून प्राप्त अहवालात सदर बांधकाम हे नाल्यावरील जागेत असल्याचे सिद्ध झाले आहे. सदर जागेवर महसूल व वन विभागाची मालकी निश्चित झालेली आहे.
सदर अतिक्रमण काढण्यासाठी महसूल व वन विभागाने संयुक्त अभियान राबवित अतिक्रमण काढण्याची नोटीस अतिक्रमणधारकास 8 मार्च 2023 रोजी दिली आहे. परत 10 मार्च 2823 ला अतिक्रमण धारकांने तहसीलदार कुरखेडा यांना बाजू मांडण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला होता, ज्याचे उत्तर दाखल 20 मार्च 2023 ला प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी म्हणणे मांडण्याची संधी दिलेली होती. सदर तारखेला अतिक्रमणधारक उपस्थित न राहता जागे बाबत कसलेही पुरावे सादर केले नसल्याचे समजते. आपत्ती संदर्भातील गंभीर प्रश्न उपस्थित झाला असतांना सुद्धा सदर पत्रव्यवहार व अतिक्रमण धारकास संधी देवून दीड महिन्याचा कालावधी लोटूनही अतिक्रमण काढण्यात न आल्याने नागरिक आक्रमक झालेले आहेत. विद्यानगर येथील रहिवाशांनी कुरखेडा येथील तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार राजकुमार धनबाते यांना निवेदन सादर करत आंदोलनाची चेतावणी प्रशासनास दिलेली आहे.
निवेदन सादर करतेवेळी आम आदमी पार्टीचे तालुका संयोजक ईश्वर ठाकूर, तालुका सचिव ताहीर शेख, सह संयोजक अनिकेत आकरे, सह संयोजक दीपक धारगाये, युवा सह सचिव अतूल सिंद्राम, मीडिया प्रमुख शहजाद हाशमी, युवा कार्यकर्ता चेतन मैन्द, युवा कार्यकर्ता साईनाथ कोंडावार, किशोर चौधरी, रामशिला गुवाल, निखिल जांभुळकर, सिधार्थ आघात, निखिल सोनकुसरे, पंकज राउत, जागेश्वर सोरते, शालिनी राउत, रिना शेन्डे, विशाखा साखरे, गणेश खंडाइत, हीरालाल शेन्डे, रत्नमाला जनबंधु, सुनीता लाबाडे, माधुरी चौधरी, उशाबाई जाड़े , पुष्पाबाई सोरते, संगीता नेवारे, मनोरमा लाडे, अनिता कन्नाके, छत्रतीबाई गनगोइर, मनोज बुंदेले, रजनी राउत, इंदिराबाई जनबंधु, भारती बोदेले, सारुबाई हलामी, दुशिला जाळे, सागर घोडीच्चोर, रामचंद्र जांभूळकरयांच्यासह विद्यानगरातील नागरिक उपस्थित होते.