भोवळ येऊन महिलेचा मृत्यू

GADCHIROLI TODAY

आरमोरी : घरातील काम करीत असतांना एकाएक भोवळ येऊन पडलेल्या महिलेला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले जात असतांना रस्त्यातच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास ठाणेगाव येथे घडली. अर्चना दिलीप नैताम (38) रा. ठाणेगाव असे मृत महिलेचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, ठाणेगाव येथील प्रतिष्ठीत नागरीक तसेच तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिलीप नैताम यांच्या पत्नी अर्चना बुधवारी सकाळच्या सुमारास घरातीत काम करीत होते. एकाएक त्या भोवळ येऊन पडल्या. तत्काळ कुटूंबियांनी त्यांना उपचारार्थ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र उपचारार्थ नेत असतांना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.