तुम्हीही घेऊ शकता मोफत शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ ; हे कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक

GADCHIROLI TODAY

आरमोरी : महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबविले जात आहे. या योजने अंतर्गत शासकिय व खाजगी अंगीकृत रुग्णालयामध्ये मोफत शस्त्रक्रिया व उपचार केले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका, ओळखपत्र, आयुष्यमान भारत कार्ड असणे आवश्यक आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत १२०९ उपचाराकरिता दरवर्षी प्रति कुटंब ५ लक्ष तर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ९९६ उपचाराकरिता १.५ लाखापर्यंत शस्त्रक्रिया व उपचाराकरीता विमा संरक्षण दिले जातात. आरमोरी तालुक्यात एकुण आयुष्यमान पात्र ३४३०० लाभार्थी असुन त्यापैकी १०४५४ लाभार्थ्यांचे कार्ड तयार झाले आहेत. उर्वरीत २३८३२ लाभार्थ्यांनी आपले आयुष्यमान भारत कार्ड तयार करुण घ्यावे, असे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ. छाया उईके यांनी केले आहे.
आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्याने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड वैद्यकिय अधिक्षक यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे आयूष्यमान भारत कार्ड काढणे सुरु आहे. सदर माहितीसाठी जिल्हा प्रमुख निलेश धाकडे सर, सुपरवायझर लक्ष्मीकांत वासनिक, आरोग्य मित्र मोहनकर यांच्याशी संपर्क साधावा. तसेच आपल्या जवळच्या ग्रामपंचायत, आपले सरकार सेवा केंद्रातून कार्ड काढण्यासाठी संपर्क साधावा.