गडचिरोलीत शोधमोहिम ; भटकंती करणाऱ्या मनोरुग्णांना पकडले

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, पोलीस प्रशासन व दिव्यवंदना फाउंडेशनच्या सहकार्याने 3 मे रोजी गडचिरोली शहरातील रस्त्यांवर बेवारस भटकंती करत असलेल्या, वाईट अवस्थेत वावरत असलेल्या मनोरुग्णांना पकडुन त्यांच्यावर उपचार व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली.
गडचिरोली शहरात बरेच मनोरुग्ण फिरताना दिसतात. सर्वसामान्य नागरीकांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाच्यावतीने गडचिरोली शहरातील चंद्रपूर रोड, मार्गावरील परिसर, आठवडी बाजार, गांधी चौक, बसस्टॉप परिसर, आरमोरी मार्ग, पंचायत समिती, लांजेडा, या ठिकाणी शोधमोहिम राबवून त्यांना पकडण्यात आले. ही शोधमोहीम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.बी. शुक्ल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव आर.आर.पाटिल यांच्या मार्गर्शनाखाली राबविण्यात आली.
सदर अभियान टीम मध्ये महिला व बाल विकास कार्यालयाचे जिल्हा पारिविक्षा अधिकारी विनोद पाटील, विधी स्वंसेविका तथा सामाजिक कार्यकर्ते अर्चना चुधरी, दिव्यवंदना आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार, सुष्मा गलग़ले, काचन निकोरे, निलिमा धोडरे, प्रियंका पेटकर, सुप्रिया कंकलवार, लावण्या येलकुचेवार यांचा सहभाग होता.