वनकर्मचाऱ्यांना साहित्याचे वितरण ; मार्कंडा (कं) वनपरिक्षेत्र कार्यालयाचा उपक्रम

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : आलापल्ली वनविभाग अंतर्गत येणाऱ्या मार्कंडा (कं) वनपरिक्षेत्र कार्यालयात उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी व मजुरांना साहित्यांचे वितरण करण्यात आले. यामुळे वनकर्मचारी, मजुरांना कामकाज करणे सोयीस्कर होणार आहे. तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकात्मतेची भावना कायम राहावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रकाष्ट निष्कासन अधिकारी बुधनवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात मार्कंडा (कं) चे वनपरिक्षेत्राधिकारी भारती राऊत, सरपंच बेबी बुरांडे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी राऊत म्हणाल्या की, वनविभागात कार्य करणारे कर्मचारी जंगल व वन्यजीवांची सुरक्षा करण्यासाठी अथक परिश्रम घेतात. यासाठी वनकर्मचारी व मजुरांना सुरक्षित राहणे गरजेचे आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणारे क्षेत्र सहायक, वनरक्षक, वन व्यवस्थापन समितीचे सदस्य, फायर वॉचर, रोपवन चौकीदार, बारहमाही चौकीदार, रोजंदारी वनमजूर, आष्टीचे समाजसेवी संगठन व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना शुज, टी-शर्ट, पॅन्ट यासह इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले.