गडचिरोलीतील दोन दारू तस्कर अडकले अहेरी पोलिसांच्या जाळ्यात

5 लाखांचा मुद्देमाल जप्त
GADCHIROLI TODAY
अहेरी : अहेरी पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात गडचिरोली शहरातील दोन दारुतस्कर अडकले आहेत. या कारवाईत देशी दारुसह चारचाकी वाहन असा एकूण 4 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रथम सुरेश सांगेल (22), अजय कृष्णा खोब्रागडे (22) रा. विवेकानंदनगर ता. गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, आलापल्ली चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस शिपाई मंथनवार यांना गोमणी ते आलापल्ली मार्गे दारुची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अहेरी पोलिसांनी बोटलाचेरु फाट्यावर सापळला रचला असता एम. एच. 020 डब्लू. ए. 7192 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता वाहनात 96 हजार रुपये किंमतीची देशी दारु आढळून आली. यावेळी देशी दारुसह चारचाकी वाहन जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रथम सांगेल, अजय खोब्रागडे या दोघांवर दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या मार्गदर्शनात अहेरी पोलिसांनी पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण करीत आहेत. अहेरी पोलिसांच्या धडक कारवाईने दारू तस्करांचे पुन्हा धाबे दणाणले आहे.
Two liquor smugglers from Gadchiroli were caught by the police