दुचाकीची झाडाला धडक, एकाचा मृत्यू

GADCHIROLI TODAY

धानोरा : दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज धानोरा-रांगी मार्गावरील पुसवांडी फाट्यावरील वळणावर सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. शम्मी यार मोहम्मद शेख (56) रा. धानोरा असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शम्मी हा स्वतःच्या दुचाकीने कामानिमित्त धानोरावरून रांगीकडे जात होता. दरम्यान, धानोरावरून चार किमी अंतरावर वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडाला धडकली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून तो रस्त्यावर पडला होता. या मार्गाने जाणा-या नागरिकांनी त्याला ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भरती केले. मात्र डॉ. देवेंद्र सावसाकडे यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेने धानोरावासीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.