आयटीआयमध्ये रोजगार मेळावा ; नामांकित कंपन्या होणार सहभागी

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 10 व 11 मे रोजी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे 10 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामंकित कंपन्या उपस्थित राहणार असून इच्छुक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने केले आहे.