MahaDBT पोर्टल संदर्भातील ‘तो’ संदेश दिशाभूल करणारा ; शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध

MahaDBT पोर्टल संदर्भातील ‘तो’ संदेश दिशाभूल करणारा ; शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडत 15 मे पर्यंत असल्यासंदर्भातील संदेश अज्ञाताने विविध समाज माध्यमांवर प्रसारित केले आहे. अशाप्रकारची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली नसून हा संदेश दिशाभूल करणारा आहे. शेतकऱ्यांना MahaDBT वर अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडत दिनांक 15 मे पर्यंत असल्याचे तसेच त्यानंतर जवळपास 2 ते 3 महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचे संदेश, माहिती अज्ञाताने विविध सामाज माध्यमांवरप्रसारित केलेले आहेत. तरी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल संदर्भात अशाप्रकारचा कोणताही संदेश / माहिती कृषि विभागामार्फत देण्यात आलेली नाही, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध असुन सदर अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांनुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येत आहे. तरी https://mahadbt.maharashtra.gov.in/ शेतकरी य़ोजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात येत आहे.