ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

GADCHIROLI TODAY

कुरखेडा : भरधाव ट्रकने दुचाकीस धडक accident दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील सती नदीपुलावर घडली. मोरेश्वर राऊत (52) रा. कुंभीटोला असे गंभीर जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मोरेश्वर राऊत हा एमएच 33 यु 7557 क्रमांकाच्या दुचाकीने काही कामानिमित्त कुरखेडा येथे आला होता. काम आटोपल्यानंतर तो आपल्या गावाकडे परत जात होता. दरम्यान, सती नदीपुलावर पोहोचताच समोरुन येणा-या सीजी 07 सीए 5270 क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार मोरेश्वर राऊत गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जखमीला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेसंदर्भात कुरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.