‘मे’ हिट ; अवकाळीनंतर वाढत्या उकाड्याने अंगाची लाहीलाही

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : मागील पंधरवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने कहर केला होता. अशातच मागील चार दिवसांपासून मे महिन्यातील प्रत्येक दिवस उष्णतेचे नवीन आव्हाने घेऊन येत आहे. जिल्ह्याचा पारा 40 अंशावर गेला असून वाढत्या उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे. यामुळे नागरिकांना ख-या अर्थाने जिल्ह्याला ‘मे’ हिटचा तडाखा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
ऐन उन्हाळ्याच्या कालावधीत जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला. यामुळे रात्री थंडी तर दिवसा उष्मा असे वातावरण दिसून येत होते. या अवकाळी वादळी पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत पडण्यासोबतच शेतकऱ्यांच्या पिकांचेही प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील ढगाळी वातावरण कामय असतांनाच मागील काही दिवसांपासून गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. मागील चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होऊन शहराचे तापमान चाळीशी पार गेले आहे. शहरात रविवारी 38 अंश सेल्सिअस तर सोमवार, 8 मे रोजी 39 अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद झाली होती. तर आज मंगळवारी म्हणजेच 9 एप्रिलला एप्रिलला तापमानात आणखी वाढ झाली असून शहरात 40 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे. सकाळी 8 वाजेपासूनच ऊन्हाचे चटके जाणवू लागत असून दुपारी 4 वाजेपर्यंत सदर वातावरण कायम असते. या ऊन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.