अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, १० मे रोजी सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा-असरअल्ली राष्ट्रीय महामार्गावरील अंकिसा पासून दोन किमी अंतरावर असलेल्या येरावागु नाल्या नजीकच्या समक्का सारक्का मंदिराजवळ सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. प्रवीण साई पानेम (२८) रा. सिरोंचा असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रवीण पानेम हा मच्छिमार व्यवसाय करीत होता. तो सोमनूर येथे मच्छी व्यवसायासाठी नियमित सकाळी दुचाकीने ये-जा करायचा. दरम्यान, बुधवारी सोमनूर येथे जात असतांना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, प्रवीणचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.