‘त्या’ पोलीस-नक्षल चकमकीची होणार दंडाधिकारीय चौकशी

त्या’ पोलीस-नक्षल चकमकीची होणार दंडाधिकारीय चौकशी
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबीया) अंतर्गत हिकेर जंगल परिसरात 1 एप्रिल 2023 रोजी झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेबाबत कोणत्याही व्यक्तीस माहिती असल्यास लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांचे समक्ष सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना हिकेर जंगल परिसरात पोलीस व नक्षल चकमकीदरम्यान गोळीबारात एक पुरुषाचा मृतदेह सापडल्याने सदर मृत्यूचे कारण तपास करण्यासाठी दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया सुरु केली आहे. सदर प्रकरणात फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये चौकशी करावयाची आहे. तरी सदर घटनेबाबत कोणत्याही व्यक्तीस माहिती असल्यास घटनास्थळी, प्रत्यक्षदर्शी चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांचे समक्ष जाहीर सूचना प्रसिद्धी झाल्यापासून 15 दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे. माहितीमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे घटनेचे वर्णन, आपण आपला या घटनेविषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधित काही घटना घडली असल्यास त्याविषयी माहिती सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्याविषयी आपले म्हणणे व या घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती या प्रकारे सादर करायची आहे.