उशिरा येणाऱ्या चांदा – गोंदिया रेल्वे गाडीमुळे प्रवाशी त्रस्त : देसाईगंज तालुका आम आदमी पक्षाने वेधले रेल्वे प्रशासनाचे लक्ष

GADCHIROLI TODAY

देसाईगंज : स्थानिक रेल्वे स्टेशनवर येणारी चांदा – गोंदिया रेल्वे गाडी उशिरा येत असल्याने प्रवाशांना अडचण निर्माण होत आहे. यासह विविध समस्यांकडे देसाईगंज तालुका आम आदमी पक्षाने स्टेशन मॅनेजरचे लक्ष वेधत निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, चांदा -गोंदिया गाडी दिवसेंदिवस प्रत्येक वेळी उशिराने थांब्यावर पोहोचते. परिणामी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या काळापासून ही ट्रेन अशीच धावत आहे. स्थानकावर पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा नाही, पंख्यांची व्यवस्था नाही, ट्रेन उशिरा धावत असल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत. यामुळे सदर समस्या तत्काळ मार्गी लावण्याची मागणी देसाईगंज तालुका आम आदमी पक्षाने केली आहे. निवेदन देतेवेळी आम आदमी पक्षाचे फारुक पटेल, भरत दहलांनी, दिपक नागदेवे, वामन पगाडे, शिल्पा बोरकर, अतुल ठाकरे, शेकर बारापात्रे आदी उपस्थित होते.