रोडरोलरच्या खाली दबून चालकाचा मृत्यू

आपापल्ली गावाजवळील घटना

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : रोडरोलरवरून रस्ता बांधकामाच्या दिशेने जात असताना अचानक रोडरोलरच्या खाली आल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सुभाषनगर-आपापल्ली मार्गावर घडली. विनोद मारोती कुमरे (45) रा. बोथली ता. सावली जि. चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अहेरी तालुक्यातील आपापल्ली गावाजवळ रस्त्याचे काम सुरु आहे. अशातच सकाळच्या सुमारास चालक विनोद कुमरे हा रोडरोलर घेवून सुभाषनगर येथून आपापल्ली येथे जात होता. दरम्यान, रोडरोलर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उतरला. रोडरोलरवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात विनोद खाली पडला व रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. अधिक तपास अहेरी पोलिस करीत आहेत.

Driver# dies# after# being# crushed# under# road roller#