थरारक घटना : कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची हत्या

GADCHIROLI TODAY

कोरची : घरगुती वादातून पतीने कु-हाडीने डोक्यात वार करून पत्नीची हत्या केल्याची थरारक घटना बुधवारी रात्रो 9 वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोंडे येथे घडली. समसोबाई रावजी कल्लो (55) असे मृत पत्नीचे नाव असून फरार आरोपी पती रावजी कल्लो यास पोलिसांनी अटक केली आहे.
कोरची तालुका मुख्यालपासून 15 किमी अंतरावर बोंडे येथील रहिवासी मृतक समसोबाई कल्लो या बुधवारी रात्रीच्या सुमारास जेवण करुन झोपी गेल्या होत्या. दरम्यान पती रावजी कल्लो याने दारु पिऊन घरी येत पत्नीशी वाद घातला. वाद शिगेला पोहोचताच रावजीने पत्नीच्या कानावर, डोक्यावर कु-हाडीने वार घातले. प्रचंड रक्तस्त्रावाने समसोबाईचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर रावजी घटनास्थळावरुन फरार झाला. या घटनेची तक्रार मृतकाचा मुलगा स्वप्नील रावजी कल्लो याने कोरची पोलिस ठाण्यात केली. कोरची पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 302 भादंवी अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध घेतला. दरम्यान गुरुवारी आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमोल फरतडे करीत आहेत.