5 ते 6 वर्षे वनवन भटकूनही न्याय न मिळाल्याने कामगाराने सुरू केले उपोषण

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : सलग 15 वर्ष सेवा बजावल्यानंतर काही दिवस प्रकृतीचा कारणाने कर्तव्यावर गैरहजर राहील्याने सेवेतून कमी करण्यात आले. या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी मागील 5 ते 6 वर्षे वनवन भटकूनही न्याय न मिळाल्याने पिडीत हातपंप दूरूस्ती कामगाराने सेवेत पूर्ववत सामावून घ्यावे, या मागणीला घेऊन येथील पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.देवचंद लक्ष्मन ढवळे रा. घाटी असे पिडीत कामगाराचे नाव आहे.

देवचंद ढवळे हे कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत हातपंप दुरुस्ती वाहनावर कामगार म्हणून मानधन तत्वावर कार्यरत होते. सन 2002 मध्ये रूजू होत त्यांनी सलग 15 वर्षे कुरखेडा पंचायत समितीसह जिल्ह्यातील अन्य पंचायत समिति अंतर्गतही त्यांनी सेवा बजावलेली आहे. मात्र सन 2017 मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव कर्तव्यावर काही दिवस गैरहजर राहिल्याने तोंडी सूचना देत त्यांची सेवा समाप्त करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मागील चार वर्षापासून सेवेत रूजू करून घ्यावे याकरीता जिल्हा परिषद प्रशासनाकडे विनंती अर्ज करीत आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सूद्धा केले आहे. मात्र प्रशासनाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे न्याय मिळत नसल्याने देवचंद यांनी गुरुवारपासून येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सूरू केले आहे.