लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने 12 वर्षीय मुलीला चिरडले

GADCHIROLI TODAY
-आष्टी येथील घटना
गडचिरोली : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने 12 वर्षीय मुलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 14 मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आष्टी येथील आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील वनविभागाच्या तपासणी नाक्याजवळ घडली. सोनाक्षी मसराम (12 ) रा. नांदागाव फाटा ता. राजुरा जि. चंद्रपूर असे मृतक मुलीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, बल्लारशाकडे लोहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३४ बि जेड ०२५५ या ट्रकच्या चाकाखाली मुलगी चिरडल्या गेली. यात तिचा मृत्यु झाला. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला असता पोलिसांनी पाठलाग करुन ट्रक ताब्यात घेतला आहे. घटनेची माहिती होताच आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविछेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.