BIG BREAKING ; चीचडोहच्या पाण्यात बुडून चार युवकांचा मृत्यू

BIG BREAKING ; चीचडोहच्या पाण्यात बुडून चार युवकांचा मृत्यू
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : चीचडोह बॅरेजच्या दरवाज्याखालील खोलगट भागात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना आज रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. मोनु त्रिलोक शर्मा ( 26) रा. गडचिरोली, प्रफुल विठ्ठल येलुरे (20) , शुभम रूपचंद लांजेवार (24), महेश मधुकर घोंगडे ( 20 ) सर्व राहणार कृषक हायस्कूल जवळ चामोर्शी असे मृतकांचे नाव आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सदर युवक चीचडोह बॅरेजवर फिरायला गेले होते. दरम्यान, त्या युवकांचा पोहण्याचा मोह झाल्याने ते बॅरेजच्या पाण्यात उतरले. अशातच चार युवक खोलगट भागात गेल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस व बचाव पथकाने घटनास्थळ गाठून जिवाची पर्वा न करता बोट किंवा डोंगा उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वतः ला रस्सी दोरखंड बांधून खोल पाण्यात उड्या मारल्या. साधारणतः एक तास शोधमोहीम केल्यावर चारही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. स्थानिक युवकांनी पोलीसांना याकामी मदत केली. यावेळी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे, पी एस आय तुषार पाटील व इतर पुलिस कर्मचारी उपस्थित होते.