… तोपर्यंत सुरजागडची वाहतूक बंद करा, अन्यथा आंदोलन : महेंद्र ब्राम्हणवाडे

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : आष्टी – आलापल्ली – सिरोंचा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत सुरजागड प्रकल्पाच्या वाहनांची वाहतूक त्वरित बंद करावी, अन्यथा जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे.
सुरजागडमध्ये चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळेचे आष्टी आलापल्ली – सिरोंचा महामार्गाची दैनिय अवस्था झाली आहे. या जड वाहनांच्या स्पीडवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने रोज अपघात होत आहे. अनेकांना जीवही गमवावा लागत आहे. हे अपघात रोखण्याकरिता रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने वारंवार केली जात असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उदासीनच असल्याचे दिसून येते. आजच एका शिक्षकाचा ट्रक खाली येऊन मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वी एका चिमुकलीचा मृत्यू झाला. त्यामुळे हे फक्त अपघात नसून सुरजागडच्या कपंनी मार्फत करण्यात येणारी हत्या आहे. त्यामुळे जो पर्यंत आष्टी – आलापल्ली – सिरोंचा महामार्गचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सुरजागड प्रकल्पात चालणाऱ्या वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.