हत्या करुन मृतदेह झाडाला लटकविण्याचे प्रकरण ;  आरोपीची कारागृहात रवानगी

GADCHIROLI TODAY

भामरागड : तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मलमपुदूपूर येथील कल्पना कोठारे या विवाहित महिलेची हत्या करुन मृतदेह झाडाला लटकविण्यात आले होते. या हत्येप्रकरणी तब्बल एक महिन्यानंतर 19 मे रोजी लाहेरी पोलिसांनी गुड्डू गावडे या आरोपीस अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार गुड्डू गावडे या आरोपीने एक महिन्यापूर्वी कल्पना कोठारे या विवाहित महिलेचे हत्या करुन तिचे मृतदेह शेतातील झाडाला लटकविले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करीत लाहेरी पोलिसांनी प्रकरणाची युद्धस्तरावर तपास सुरु केला होता. तब्बल एक महिन्याच्या सखोल चौकशीअंती महिलेच्या हत्ये प्रकरणी गुड्डू गावडे यास 19 मे रोजी अटक करण्यात आली होती. सोमवारी आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस कारागृहात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.