२६ ला रोजगार व स्वयंरोजगार मेळावा ; नामांकित कंपन्यासह महामंडळांचा राहणार सहभाग

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 मे रोजी देसाईगंज येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे 10 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या, महामंडळे उपस्थित असणार असून रोजगार मेळाव्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने केले आहे.