विहिरीत उडी घेऊन नवविवाहितेने संपवली जीवनयात्रा

विहिरीत उडी घेऊन नवविवाहितेने संपवली जीवनयात्रा

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : एका नवविवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या गुंडापल्ली गावात मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. हसिना दुधकुंवर (22) असे मृतक नवविवाहितेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुंडापल्ली येथील रहिवासी असलेल्या हसिनाचा विवाह 1 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील उंदिरगाव येथील स्वप्नील दुधकुंवर नामक युवकाशी झाले होते. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या पतीसोबत माहेरी गुंडापल्ली येथे आली होती. दरम्यान दोघेही पती-पत्नी कुटूंबियाच्या विवाह समारंभात जाणार होते. मात्र मंगळवारी सकाळच्या सुमारास हसिनाने शौचास जात असल्याचे सांगित गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती प्राप्त होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. आष्टी पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळ गाठित पंचनामा करण्यात आला. अधिक तपास आष्टी पालिस करीत आहेत.