तीन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

-पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यात यशस्वी कार्यकाळ पूर्ण केलेल्या तीन उपविभागीय पोलिस अधिकारी यांची इतर जिल्ह्यामध्ये बदली झाली आहे. यानिमित्त पोलिस मुख्यालयात आयोजित निरोप समारंभात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा यांची सांगली जिल्ह्यातील उपविभाग मिरज, धानोराचे एसडीपीओ स्वप्नील जाधव यांची पुणे जिल्ह्यातील उपविभाग दौड व अहेरीचे एसडीपीओ अमोल ठाकूर यांची सातारा जिल्ह्यातील कराड उपविभाग येथे बदली झालेली आहे. याबद्दल पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तिन्ही सत्कारमूर्ती यांनी गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या सेवेबाबत मनोगत व्यक्त करून अनुभव सांगितले.
या समारंभाला अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर, पेंढरीचे उपविभागीय अधिकारी मयूर भुजबळ व सर्व शाखा प्रभारी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा प्रभारी अधिकारी व अमंलदारानी अथक परिश्रम घेतले.