‘या’ प्रकारामुळे साखरा ग्रापंच्या सदस्यांनी मासिक सभेवर टाकला बहिष्कार

‘या’ प्रकारामुळे साखरा ग्रापंच्या सदस्यांनी मासिक सभेवर टाकला बहिष्कार

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : तालुक्यातील ग्रामपंचायत साखरा येथील सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रापं उपसरपंचासह सदस्यांनी २४ मे रोजी होणाऱ्या मासिक सभेवर बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भातील पत्र जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंसचे गट विकास अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत साखरा येथील विद्यमान सरपंच हे ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता परस्पर ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेणे, उपस्थितांना बाकी सदस्यांविरुद्ध भडकविणे, मासिक सभेचे नोटीस वेळेवर न काढणे, मासिक सभेत कोणत्याही प्रकारची सदस्यांसोबत चर्चा न करता परस्पर आपल्या मताने ग्रामसभेचे आयोजन करणे इत्यादी बाबी ग्रामपंचायतमध्ये होत आहेत. यासंदर्भात विद्यमान सरपंच यांना विचारणा केली असता ते उद्धटपणे उत्तरे देतात. या त्रासाला कंटाळून सर्व सदस्यांनी २४ मे ला आयोजित मासिक सभेवर बहिष्कार टाकला आहे. तसेच यापुढे ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या मासिक सभेवर सुद्धा बहिष्कार टाकत असल्याची माहिती जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी पंचायत समिती गडचिरोली तथा सचिव ग्रामपंचायत साखरा यांना पत्रातून दिली आहे. निवेदन देतांना ग्रापंचे पदाधिकारी अर्चना बोरकुटे, कांचन चौधरी, जयमाला मेश्राम, अश्विनी जनबंधू, दिनेश चौधरी उपस्थित होते.