ट्रकचालकाचा अपघातात मृत्यू

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : रात्रीच्या सुमारास ट्रक चालिवत असतांना डुलकी आल्याने ट्रक चालकाने उभ्या ट्रकला दिलेल्या भीषण धडकेत अहेरी तालुक्यातील एका ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील विठ्ठलवाडा येथे घडली. अमिद शेख (35) रा. राजपूर (बोरी) ता. अहेरी असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार अहेरी तालुक्यातील अमिद शेख हा ट्रक चालक ट्रक क्र. एम. एच. 33 टी 1882 मध्ये लाकडे भरुन रात्रीच्या सुमारास आलापल्ली येथून बल्लारपूरकडे जात होता. दरम्यान आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील विठ्ठलवाडा बसस्थानाकाजवळ चालकाला डुलकी आल्याने उभ्या असलेल्या ट्रकला जबर धडक बसली. या भीषण अपघातात ट्रकचालक अमिद जागीच ठार झाला.