‘शिवाजी’च्या MCVC शाखेचा निकाल १०० टक्के : स्नेहल कोतकोंडावार प्रथम

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२ वी च्या परीक्षेत स्थानिक शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील एम.सी. व्ही. सी शाखेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी स्नेहल कोतकोंडावार हिने ८१ टक्के गुण प्राप्त करून प्रथम, संघर्ष देवतळे याने ८०.८३ टक्के गुणासह द्वितीय व दिव्या बोगावार हिने ७६.८३ टक्के गूण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या महाविद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांपैकी २ प्राविण्य श्रेणी, ६ प्रथम श्रेणी तर ४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीमध्ये प्राविण्य प्राप्त केले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, प्राचार्य डॉ. एम.जे. मेश्राम, प्रभारी प्राचार्य डॉ. आर.पी. करोडकर, ग्रंथपाल प्रा. एस.सी. राऊत, बी.के.निकुरे, निखिल लाकडे, कुलदीप पोरटे, नितीश केळझरकर, भारती फुलझेले, विशाल भांडेकर व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिले. गुणवंत व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, बानबले व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.