12th result – गडचिरोलीतील 30 शाळांचा 100 टक्के निकाल ; विभागातून जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

12th result – गडचिरोलीतील 30 शाळांचा 100 टक्के निकाल 

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने आज 25 मे रोजी इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल दुपारी 2 वाजतानंतर जाहीर करण्यात आला. यात गडचिरोली जिल्हा नागपूर विभागातून दुसऱ्या क्रमांकावर असून निकाल 92.01 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, यंदा जिल्ह्यातील केवळ 30 महाविद्यालयांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
जिल्ह्यात कला, वाणिज्य व विज्ञान अशा तिन्ही शाखा मिळून या परिक्षेसाठी एकूण 12 हजार 353 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यापैकी 12 हजार 158 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परिक्षा दिली. यापैकी 11 हजार 187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात उत्तीर्ण मुलांची संख्या 5 हजार 604 तर मुलींची संख्या 5 हजार 583 आहे. उत्तीर्ण मुलांच्या निकालाची टक्केवारी 90.6 तर मुलींची 940.5 आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. गडचिरोली जिल्ह्याचा निकाल 92.01 टक्के लागला असून सर्वाधिक टक्केवारी मुलचेरा तालुक्याची 94.88 आहे. त्यानंतर गडचिरोली 94.62 टक्के, सिरोंचा 94.12 टक्के, आरमोरी 93.99 टक्के, कोरची 93.88 टक्के, देसाईगंज 93.20 टक्के, कुरखेडा 92.97 टक्के, धानोरा 92.40 टक्के, एटापल्ली 92.11 टक्के, चामोर्शी 91.18 टक्के, अहेरी 89.46 व भामरागड तालुक्याचा निकाल 84.58 टक्के एवढा लागला आहे.