CSS, JS, React, Java, MySQL तंत्रज्ञानाचे धडे देणाऱ्या गोंडवानाच्या अल्फा अकॅडमीत कोणाला मिळणार प्रवेश ? ; आय टी कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट प्रोग्रामिंग भाषा अभ्यासक्रम आणि मास्टर ट्रेनर तयार करण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी अल्फा अकॅडमी सुरु करण्यात आली. आज घडीला प्रवेशित ५०० विद्यार्थी CSS, JS, React, Java, MySQL तंत्रज्ञानाचे धडे घेत असून त्यांना आय टी कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी गोंडवाना विद्यापीठाने नास्कॉम (NASSCOM) मान्य प्रशिक्षण भागीदार – लर्नकोचची निवड केली आहे. यातून विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची इंटर्नशिप आणि मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची संधी मिळणार आहे.
संगणकावर कॉपी पेस्ट करणे, फाईल एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डरमध्ये हलवणे संगणकावर एखादा प्रोग्राम इन् स्टॉल करणे असे सामान्य कौशल्य आत्मसात असणाऱ्यांची संख्या ही कमी आहे. संगणकीय कोडींग सारखी तुलनेने अवघड कौशल्य आत्मसात असणाऱ्यांची टक्केवारी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी आहे. माहिती तंत्रज्ञानाचा आवाका सेवाक्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नसून चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अभियांत्रिकी, क्वांटम संगणक आणि इतर अनेक क्षेत्रातील आय टी क्षेत्राशी निगडित कौशल्य विद्यार्थ्यांना अवगत व्हावी यासाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या सहकार्याने आणि जिल्हाधिकारी संजय मीना यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अल्फा अकादमी प्रकल्पाची कल्पना केली आहे. त्याअनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सामजस्य करार झाला. अल्फा अकॅडमीमध्ये आज घडीला ५०० विद्यार्थी प्रवेशित आहेत. यासाठी गोंडवाना विद्यापीठाने नास्कॉम (NASSCOM) मान्य प्रशिक्षण भागीदार – लर्नकोचची निवड केली आहे. CSS, JS, React, Java आणि MySQL तंत्रज्ञान विद्यार्थी शिकत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना 100 टक्के इंटर्नशिप असेल आणि निवडलेले विद्यार्थी आय टी कंपन्यांमध्ये काम करू शकतील.
कोणते अभ्यासक्रम शिकवले जातील
फुल स्टॅक वेब development, C/C++, HTML, CSS, JS, ReactJS, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सहा महिन्यांचे नास्कॉम सर्टिफिकेट कोर्स आहेत. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये तीन महिन्यांसाठी इंटर्नशिप आणि त्यानंतर अश्याच मोठ्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळेल.
कोण घेऊ शकेल प्रवेश
गोंडवाना विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थी, किमान पात्रता म्हणून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असलेले सुशिक्षित आणि बेरोजगार तरुण, किमान पात्रता म्हणून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असलेले इतर कोणतेही शाखेचे विद्यार्थी
अल्फा अकॅडमी चा उद्देश
शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे आणि येथील आदिवासी समाजाचा आर्थिक स्तर वाढणे हा आहे. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास पुरेसे नाही. त्यामुळेच डिजिटल कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो.
अल्फा अकॅडमीमुळे विद्यार्थ्यांना होणारा फायदा
* आय टी क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याच्या संधी मिळेल.
* बाहेरील देशात सुद्धा काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकते.
*या क्षेत्रात खूप चांगले वेतन ही मिळेल.
* विद्यार्थी अनुभव घेऊन स्वतःची कंपनी देखील उभी करू शकतात.
*विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला एक नवीन दिशा मिळते.
* विद्यार्थी तंत्रज्ञानाचा वापर करून समाजामध्ये खूप सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.
*विद्यार्थी वेगवेगळ्या वेबसाइट्स बनवू शकतात आणि यावरून आर्थिक उत्पन सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळू शकते.
असे अनेक फायदे आहेत. अल्फा अकॅडमी मुळे विद्यार्थ्यांना करिअरमध्ये खूप चांगला फायदा होऊ शकतो.