आष्टी येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

आष्टी येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
GADCHIROLI TODAY
चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथील एका युवकाने आपल्या राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ मे रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रोहीत विनायक बावणे (25) रा.आष्टी असे मृतकाचे नाव आहे.
मृतकाचे नातलग कांचन मांडवगडे हीअनिल कापड दुकान येथे काम करते. तिची १२.३० वाजता जेवनाची सुट्टी झाली तेव्हा ती घरी पोहचून आपले जेवन आटपून रोहीत च्या घराकडे गेली. तेव्हा तिला रोहीत फाशी लागलेल्या स्थीतीत दिसून आला. लागलीच तिने आपल्या कुटुंबातील लोकांना माहिती दिली. त्यावरुन मृतकाचा भाऊ अर्पित बावणे यांनी त्याला खाली उतरून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधीक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.