‘या’ कारणांमुळे सुरजागड कंपनीच्या विरोधात काँग्रेस घेणार आक्रमक पवित्रा

‘या’ कारणांमुळे सुरजागड कंपनीच्या विरोधात काँग्रेस घेणार आक्रमक पवित्रा
-आष्टी येथील बैठकीत निर्णय
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : सुरजागड खदानीत चालणाऱ्या वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. दिवसेंदिवस अपघातांचे व मृत्यूचे सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. आष्टी-आलापल्ली-सिरोंचा महामार्गाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत सुरजागड खदानीची वाहतूक बंद करण्यात यावी, यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने वेळोवेळी मोर्चे, आंदोलन व निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याने आता सुरजागड कंपनी विरोधात आक्रमक पवित्रा हाती घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
सुरजागड कंपनीमुळे निर्माण झालेल्या अनेक समस्यांकडे काँग्रेसच्या वतीने वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन, सरकार व लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णपणे डोळेझाकपणा केला आहे. त्याचेच परिणाम म्हणून आज अनेक लोकांना अपघातात आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून जनतेच्या हक्कासाठी आता काँग्रेस पूर्णपणे रस्त्यावर उतरणार असून आगामी काळात लाईट मेटल कंपनी व सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय आष्टी येथे पार पडलेल्या बैठकीतून घेण्यात आला.Photo
गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. नितीन कोडवते, सचिव डॉ. चंदाताई कोडवते, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, अहेरी तालुका अध्यक्ष डॉ. पप्पू हकीम, मूलचेरा तालुकाध्यक्ष प्रमोद गोटेवार, पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजेश ठाकूर, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, बंगाली सेल अध्यक्ष बीजन सरदार, जिल्हा उपाध्यक्ष मुस्ताक हकीम, रमेश कोडापे, पंकज पस्कुलवार, के पी मंडल, डी जे सरदार, सेमल दास, आनंद कांबळे, आय एस हलदर, रमेश मंडल, प्रेमानंद गोंगले, विश्वास बोमकंटीवार, हेमंत कुंबरे, शामराव वनकर, देवेंद्र भोयर, योगेंद्र जंजाळ, अनंत मुजुमदार, विनोद येलमुळे, दिवाकर कोहळे, धनराज वासेकर, दिलीप बनकर, कालिदास बुरांडे, प्रकाश ब्राह्मण, मधुकर सडमेक, रज्जाक पठाण, राघोबा गोरकर, मोहम्मद शेख, नामदेव आत्राम, रसिक बूमावार, विलास शेंडे, चंदू बोरीले, दानिश हकीम, गणेश उपलवार, काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी, स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.