अचानक लागलेल्या आगीत घरासह जीवनावश्यक साहित्य जळून खाक

GADCHIROLI TODAY

-माजी जिप अध्यक्षांनी दिला मदतीचा हात
अहेरी : तालुक्यातील येरमनार( टोला ) येथील डोलु पेन्टा मडावी यांच्या घराला अचानक आग लागल्याने घरासह जीवनावश्यक वस्तु, पैसे, आधार कार्ड, पास बुक व आवश्यक कागदपत्रे जाळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच माजी जिप अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन मदतीचा हात दिला.
विशेष म्हणजे, घटनास्थळी चारचाकी वाहन जात नसल्याने 2 किमी अंतर पायदळ प्रवास करून माजी जिप अध्यक्ष कंकडालवार यांनी मडावी कुटुंबाची भेट घेवून तांदूळ, तेल, दाळ, साबण, कोलगेट अशा जीवनावश्यक साहित्यांसह आर्थिक मदत केली. सोबतच प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचे सांगत कुटुंबाला धीर दिला. तसेच प्रत्येक लोकप्रतिनिधींनी जनतेच्या अडी-अडचणी किंवा अचानक झालेल्या आघातवेळी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे बोलले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी उपसभापती लालसु आञाम, माजी संरपच तथा सदस्य सुधाकर तिम्मा, ग्राप सरपंच पेरमिली किरण नैताम, माजी उपसरपंच साजन गावडे, उपसरपंच विजय आत्राम, दलसु आत्राम, लच्छु आत्राम, प्रशांत गोडसेलवार, विनोद रामटेके, मल्ला तंलाडी, लक्ष्मण कुळमेथे, प्रविण दुर्गे, हनमंतु दुर्गे, डोलु मडावी, सतिश तंलाडी, संदिप गावडे, सादु कुळमेथे, वारलु जोगी, मडावी कुटुंबातील सदस्य इरपे डोलु मडावी, प्रदीप मडावी, प्रशांत मडावी, सपना मडावीसह गावातील नागरिक उपस्थित होते.