शेतातील झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : शेतातील झाडाला गळफास (Suicide) घेऊन इसमाने आत्महत्या केल्याची घटना आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मलेझरी येथे 27 मे रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.लक्ष्मण चांदेकर (57) रा. मलेझरी असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मण चांदेकर याने घटनेच्या दिवशी सकाळीच आपल्याकडील असलेली बैलजोडी विकली. खरेदीदारास ते बैल गावाबाहेर सोडून देण्यास गेला. त्यानंतर घरी येऊन शेजारच्या गावात मोठ्या बैलास जोड घेतो म्हणून घरातील कुटुंबातील लोकांना सांगितले. मात्र उन्हाचा तडाखा असल्याने त्यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला. परंतु लक्ष्मणने काहीएक न ऐकता घरुन निघून गेला. स्वतःच्या शेतात जाऊन शेतातील झाळाला गळफास लावून घेतला. सायंकाळच्या सुमारास कुटूंबियांना माहिती मिळताच, आष्टी पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अधिक तपास पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.