गडचिरोली जिल्ह्यात ‘या’ तारखेला अवकाळीची शक्यता ; वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने घरांचे केले नुकसान

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : हवामान विभागाने जिल्ह्यात 30 व 31 मे रोजी एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. चामोर्शी तालुक्यातील कळमगाव येथे शनिवारला रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान केले आहे.
चामोर्शी तालुक्यातील कळमगाव परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे गावातील घरावरील कवेलू फुटून नासधूस झाले. तसेच नंदू मोहूर्ले यांचे टिनाचे छत असलेले घर कोसळले. त्यामुळे टिनपत्रे घरापासून अंदाजे 500 मीटरवर जाऊन शेतात पडले. आबाजी संदोकार यांच्या घरासमोर लावलेले टिनाचे छत कोसळले. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. गावात व शेतशिवारात असलेले झाडे कोसळले. नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता पुन्हा हवामान विभागाने जिल्ह्यात 30 व 31 मे रोजी पावसाचा इशारा दिल्याने उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.