दुचाकीवरून देशी, विदेशी दारूची तस्करी ; 1 लाख 67 हजाराचा मुद्देमाल जप्त

– विहिरगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : अवैधरित्या दारुची दुचाकीने वाहतूक करीत असतांना देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव येथील चौकात सापळा रचून 87 हजाराची देशी-विदेशी दारुसह दुचाकी व अन्य साहित्य असा 1 लाख 67 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्याची धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी पार पाडली. याप्रकरणी दोघांवर दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विहिरगावमार्गे अवैधरित्या दारुची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी विहिरगाव येथील चौकात सापळा रचला होता. दरम्यान दुचाकीने जात असलेल्या लाखबिरसिंग बावणी व भूषण मेश्राम यांची तपासणी केली असताना वाहना 87 हजार रुपये किंमतीची देशी, विदेशी दारु आढळून आली. दुचाकी व मोबाईल असा एकूण 1 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींविरोधात देसाईगंज येथील पोलिस ठाण्यात दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात अकबर पोयाम, प्रशांत गरफडे, श्रीकृष्ण परचाके, श्रीकांत बोईना, शगीर शेख यांनी पार पाडली.