भूसुरुंगविरोधी वाहनाची दुचाकीला धडक ; १ ठार तर २ गंभीर

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : पोलिस दलाच्या भूसुरुंगविरोधी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टी-चामोर्शी मार्गावरील अनखोडा येथे आज २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. पराग गजानन कत्रोजवार (२४) असे मृतकाचे नाव असून सागर सुरेश चुधरी (२३), महेश मोहुर्ले (२४) सर्व रा. कळमगाव हे जखमी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली पोलिस दलाचे भूसुरुंग विरोधी वाहन गडचिरोली वरून अहेरीकडे जात होते. दरम्यान, आष्टीकडून कळमगावकडे येणाऱ्या दुचाकीला सदर वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अनखोडा येथील नागरिकांनी जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पूढील उपचारार्थ चंद्रपूर ला रेफर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरु केला आहे.