इलेक्ट्रीक मोटार रिवाईडींग व दुरुस्ती प्रशिक्षण ; सुशिक्षित बेरोजगारांसाठी संधी

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय व बँक ऑफ इंडिया आरसेटी यांच्या विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी 30 दिवसांचे इलेक्ट्रीक मोटार रिवाईडींग व दुरुस्ती हे व्यवसायासाठीचे मोफत प्रशिक्षण आयोजित केले आहे. या संधीचा युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयानजीकच्या बीओआय- आरसेटी संस्था कार्यालयात हे प्रशिक्षण आयोजीत केले आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून मोजक्याच जागा शिल्लक आहेत. प्रशिक्षणादरम्यान राहणे, जेवण, चहा, नाश्ता या सोयी विनामुल्य पुरविल्या जातील. प्रशिक्षणाचा कालावधी ५ जून ते ४ जूलै पर्यंत राहिल. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ओरिजनल आधार कार्ड, पॅन कार्ड, टी सी/मार्कशिट, बीपीएल दाखला, स्वयंसहायता गटाचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र, रोजगार हमी जाब कार्ड [असल्यास] पासपोर्ट आकाराचे 4 फोटो, राशन कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी बीओआय-आरसेटी कार्यालय संपर्क क्रमांक 07132-295040, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम (9404188239), पुरुषोत्तम कुनघाडकर (8698758509) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.