10 th result गडचिरोलीतील 79 शाळांनी दिला 100 % निकाल ; एकाच तालुक्यातील दोन विद्यार्थी अव्वल

10 th result गडचिरोलीतील 79 शाळांनी दिला 100 % निकाल ; एकाच तालुक्यातील दोन विद्यार्थी अव्वल
GADCHIROLI TODAY

गडचिरोली : महाराट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यात गडचिरोली जिल्ह्याने 92.52 टक्के गुण घेत नागपूर विभागातून तृतीय स्थान पटकाविला आहे. जिल्हाभरातील 79 शाळांनी 100 टक्के निकाल देत घवघवीत यश संपादन केले. विशेष म्हणजे चामोर्शी तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांनी 96.60 टक्के गुण घेत संयुक्तरित्या अव्वल स्थान पटकाविले आहे.
जिल्ह्यातील topper कोण ?
जिल्ह्यतील दोन विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या प्रथम स्थान पटकाविले आहे. यामध्ये कारमेल अॅकडमी हायस्कूल चामोर्शीचा प्रिंस रवींद्र वडेट्टीवार व डिझनीलॅंड अॅंन्ड प्रेसिडेन्सी शाळा चामोर्शी येथील साची रमेश सोमनकर यांचा समावेश आहे. तर गडचिरोली येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाची अश्वती धनपाल शेंडे हिने 95.40 टक्क्यासह द्वितीय तर तालुक्यातीलच नवेगाव येथील संजीवनी विद्यालयाची विद्यार्थी चैतन्या बालाजी कोरडे हिने 94.60 टक्के गुण प्राप्त करीत तिसरे स्थान पटकाविले आहे.
तालुकानिहाय निकाल
सिरोंचा 95.97, कुरखेडा 93.79, चामोर्शी 93.51, देसाईगंज 93.06 ,अहेरी 92.74 ,गडचिरोली 92.37 ,एटापल्ली 91.74 ,आरमोरी 91.71 ,मुलचेरा 90.89 ,धानोरा 90.73 ,कोरची 89.55 ,भामरागड 88.18